होमपेज › Nashik › नाशिकरोड कारागृहात  विजेच्या धक्क्याने कैद्याचा  मृत्यू

नाशिक : कारागृहात विजेच्या धक्क्याने कैद्याचा मृत्यू

Published On: Jul 03 2018 11:44PM | Last Updated: Jul 03 2018 11:44PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरा कैदी जखमी झाला असून, त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी कैद्यावर वेळीच उपचार झाल्याने त्याच्या प्रकृतीचा धोका टळला आहे.

आज (दि. ३ जुलै)दुपारी कारागृहातील कैद्यांसाठी स्वयंपाक करण्याचे काम सुरु होते. शरद परदेशी (25, जि. जळगाव) हा कैदी क्रेनच्या सहाय्याने हंडा वर घेत होता. किचनच्या छतात पावसामुळे विद्युत प्रवाह उतरला होता. तो क्रेनमध्ये उतरुन परदेशी क्रेनच्या साखळीला चिकटला. त्याला वाचविण्यासाठी छगन उर्फ ऋषी रामा जाधव याने धाव घेतली. त्यालाही विजेचा धक्का लागला. दोघांना कारागृह कर्मचाऱ्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपरापूर्वीच परदेशी याचा मृत्यू झाला. परदेशीला लहान मुलीवर बलात्कारप्रकरणी पास्को कायद्याखाली १३ ऑक्टोबर २०१३ रोजी अटक झाली होती.