होमपेज › Nashik › झोळीचा फास बसून चिमुकलीचा मृत्यू

झोळीचा फास बसून चिमुकलीचा मृत्यू

Published On: Jul 23 2018 11:01PM | Last Updated: Jul 24 2018 1:08AMनाशिक : प्रतिनिधी

झोळीमध्ये गळ्याभोवती स्कार्फचा फास बसल्याने नऊ महिन्याच्या चिमुकलीचा  मृत्यू झाल्याची घटना सातपूरमधील शिवाजीनगर परिसरात सोमवारी (दि.23) घडली. आराध्या योगेश खाडपे असे या चिमुकलीचे नाव आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

शिवाजीनगर येथील शिवशक्‍ती चौक परिसरातील समर्थ रेसिडेन्सी येथे खाडपे परिवार राहतात. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मनीषा खाडपे यांनी आराध्याला झोळीत झोपवले. झोळीतून खाली पडू नये यासाठी झोळीला स्कार्फ बांधला. दरम्यान, आराध्या झोळीत असताना सरकली. त्यामुळे झोळीला बांधलेल्या स्कार्फचा फास आराध्याच्या गळ्याभोवती बसला. फास बसल्याने तिचा श्‍वास गुदमरून मृत्यू झाला. ही बाब नातलगांना समजल्यानंतर त्यांनी दुपारी तीनच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच आराध्याचा मृत्यू झाला.