Thu, Apr 25, 2019 21:23होमपेज › Nashik › सिडकोत चोरीच्या संशयातून मारहाणीत तरुणाचा मृत्यू

सिडकोत चोरीच्या संशयातून मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 26 2018 1:00AMसिडको : प्रतिनिधी

चोरी केल्याच्या संशयातून किराणा दुकानदाराने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सिडकोतील मोरवाडी येथे घडली. या प्रकरणी दुकानदार पिता-पुत्रावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरवाडी अमरधामसमोरील विनायक ट्रेडर्सचे मालक गणेशमल जगदीशप्रसाद राठी (44, रा. मोरवाडी) यांना बुधवारी (दि.25) त्यांच्या  किराणा दुकानातून मालाची चोरी होत असल्याचा संशय आला. त्यावरून त्यांनी राहुल राजेंद्र जाधव (32 , रा. सिंहस्थनगर, मूळ रा. बल्हाणे, पिंपळनेर, ता. साक्री) या संशयितास पकडले. त्याला दुकानाच्या मागील बाजूस गोदामात बांधून ठेवत बेदम मारहाण केली. या मारहाणीत राहुल जाधव बेशुद्ध झाल्याचे पाहून राठी यांनी त्याच्या मावस भावास कळवून त्याला घेऊन जाण्यास सांगितले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे खासगी डॉक्टरांमार्फत त्याला तपासले असता त्यांनी मयत घोषित केले. संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी दुकानमालक गणेशमल राठी व दीपक राठी  (25) या पिता-पुत्रांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.