Thu, Jul 18, 2019 06:28होमपेज › Nashik › अनैतिक संबंधातून जाळण्यात आलेल्या तिसऱ्या महिलेचा मृत्यू  

अनैतिक संबंधातून जाळण्यात आलेल्या तिसऱ्या महिलेचा मृत्यू  

Published On: Aug 08 2018 8:35PM | Last Updated: Aug 08 2018 8:35PMपंचवटी : वार्ताहर 

पंचवटी परिसरात मायको दवाखान्याजवळ अनैतिक संबंधाच्या वादातून प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीला तिच्या मुलीला आणि नातीच्या अंगावर पहाटेच्या सुमारास झोपेत असताना रॉकेल ओतून जाळल्याची खळबळजनक घटना घडली होती . या घटनेत पहिल्या दिवशी नऊ महिन्याच्या चिमुरडीचा, दुसऱ्या दिवशी आजीचा तर तिसऱ्या दिवशी मुलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

पंचवटी परिसरातील मायको दवाखान्‍याजवळ असणाऱ्या कालिका नगरमध्ये राहणार्‍या संगीता सुरेश देवरे (वय ३८) या महिलेचे जलालोद्दीन खान ५५ रा कानोरीय गाव, जिल्हा मथुरा नावाच्या व्‍यक्‍तीबरोबर अनैतिक संबंध होते. रविवार दि ५ रोजी संध्याकाळी झालेल्या वादातून पहाटे चार वाजेच्या सुमारास संगीता तिची मुलगी प्रीती आणि नात सिद्धी हे झोपेत असताना त्यांच्या बेडवर आणि अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत संशयित आरोपी जलालोद्दीन खान हा फरार झाला होता.  जिवंत जाळून ठार मारण्याच्या केलेल्या प्रयत्नामध्ये नऊ महिन्याच्या सिद्धी या निरागस बालिकेचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर संगिता आणि प्रिती या ७० टक्‍क्यापेक्षा अधिक भाजल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्नालयात उपचार सुरु होते. त्यानंतर मंगळवार दि ७ रोजी जळीतकांडामध्ये गंभीर जखमी असलेली आणि घटनेत मृत्यू पावलेल्या सिद्धीची आजी संगिता देवरे यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता.

आज बुधवार दि. ८ रोजी या जळीतकांडात गंभीर भाजलेली प्रीती शेंडगे हिची देखील प्राणज्योत संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास मावळली. त्यामुळे या जळीतकांडातील तीनही गंभीर जखमीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे . 

या जळीतकांडातील संशयित आरोपीला पकडण्यासाठी पंचवटी पोलिस ठाण्याचे एक पथक विमानाने दिल्लीला गेले. तेथून पुढे जात पोलिसांनी असलेल्या अलिगढ येथे संशयित आरोपी जलालोद्दीन खान याच्या मुसक्या आवळल्या.  पोलिस पथक त्याला घेऊन नाशिकच्या दिशेने रवाना झाले आहे. नेमकी घटना काय घडली होती हे आरोपी नाशिकला आल्यानंतरच उघड होणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे .