Mon, Apr 22, 2019 16:02होमपेज › Nashik › ...येथे ओशाळली माणुसकी!

...येथे ओशाळली माणुसकी!

Published On: Feb 22 2018 10:13AM | Last Updated: Feb 22 2018 10:13AMनाशिक : प्रतिनिधी

एसटीने प्रवास करा, असे महामंडळाकडून नेहमी सांगितले जाते. मात्र, ऐनवेळी दुर्दैवी प्रसंग ओढवला असता योग्य ती मदत मिळत नाही, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत असल्याचे चित्र नेहमी असते. नाशिक शहरातील राम पिंपरकर यांनाही 10 फेब्रुवारीला नाशिक ठक्कर बाजार ते औरंगाबाद प्रवासात हाच अनुभव आला.

वाचा : 'या' गावामध्ये एकही लग्‍न लावले जात नाहीत

राम पिंपरकर आणि त्यांची बहीण वासंती पुराणिक हे दि.10 रोजी सकाळी 9.30 च्या येवला आगाराच्या बसने औरंगाबादला जाण्यास निघाले. औरंगाबाद जवळ आल्यावर झोपलेल्या बहिणीस जागे करण्यास पिंपरकर गेले असता ती बेशुद्ध असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी चालक आणि वाहकाकडे मदतीची याचना केली. मात्र, त्यांनी मदत केली नाही. त्यामुळे बहिणीची तब्येत आणखी बिघडली. कोणतीही मदत न करता तिला वाहनाच्या बाहेर लवकर काढून घ्या, असे फर्मान चालक व वाहकाने सोडले. अखेर प्रवाशांच्या मदतीने बसमधून त्यांच्या बहिणीस बाहेर काढले. त्यानंतर रिक्षाद्वारे तिला औरंगाबाद येथील हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत ती गतप्राण झाली होती.

वाचा : जगातील सर्वांत मोठ्या मेंदूच्या गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया

महामंडळाच्या संवेदनाशून्य व बेजबाबदार कर्मचारी वर्गामुळे बहिणीचे प्राण गेले. आता त्यांच्यावर कारवाई होईल का? असा संतप्त सवाल पिंपरकर यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विचारला आहे. या प्रकारामुळे या एसटी कर्मचार्‍यांच्या बेजबाबदार प्रवृत्तीचा निषेध होत आहे.