Sat, Sep 22, 2018 14:35होमपेज › Nashik › नाशिक : मृत अर्भक आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनात (व्‍हिडिओ)

नाशिक : मृत अर्भक आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनात (व्‍हिडिओ)

Published On: Dec 19 2017 6:36PM | Last Updated: Dec 19 2017 6:31PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

गर्भवती महिलेच्या प्रसुतीबाबत इंदिरा गांधी रुग्णालयाकडून हलगर्जीपणा करण्यात आल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाला असल्याची तक्रार आशा अशोक तांदळे यांच्या कुटुंबियांनी केली आहे. याप्रकरणी मृत नवजात अर्भक महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनात आणून ठेवण्यात आले. 

गर्भवती महिलेला सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर मंगळवारी दुपारपर्यंत प्रसूती होणार असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी महिलेला त्रास जाणवू लागल्याने डॉक्‍टरांना कळविण्यात आले, मात्र रुग्णालयाने महिलेकडे दुर्लक्ष केले. यामुळे प्रसूतीनंतर काही अवधीत नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू झाला असल्याची तक्रार कुटुंबियांनी केली आहे.