Mon, Mar 25, 2019 04:59
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नाशिक : शिक्षकाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत

नाशिक : शिक्षकाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत

Published On: Feb 27 2018 12:49PM | Last Updated: Feb 27 2018 12:49PMसिन्नर : प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ येथे एका विहिरीत शिक्षकाचा मृतदेह आढळला. हा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,‘मऱ्हळ येथील विहिरीत आढळलेला मृतदेह अरुण सुखदेव कार्डिले यांचा आहे. ते गावाकडे परत येत असताना त्यांच्याशी असलेला संपर्क तुटला होता. त्यांनंतर त्यांचा मृतदेह  हातपाय बांधलेल्या अवस्थेत विहिरीत आढळला. विहिरीशेजारी  दुचाकी, चप्पल आणि मद्याने भरलेल्या आणि रिकाम्या बाटल्या आढळल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणाची माहिती मिळताच वावी पोलिस स्टेशनचे कर्मचारी  घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.