होमपेज › Nashik › नाशिकच्या वडाळामध्ये भंगार गोदामाला भीषण आग

नाशिकच्या वडाळामध्ये भंगार गोदामाला भीषण आग

Published On: Dec 07 2018 4:13PM | Last Updated: Dec 07 2018 4:13PM
नाशिक : प्रतिनिधी

वडाळा येथील सादीकनगर भागात असलेल्या प्लास्टिक भंगार मालाच्या गोदामाला भीषण आग लागली. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. 

आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. या दुर्घटनेत गोदामाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळाशेजारी दाट लोकवस्ती असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे निर्माण होत आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.  

ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमनचे २५ जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. आगीने रौद्र रूप धारण केले असते तर मोठा अनर्थ घडला असता मात्र अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आपले कार्य सुरू केले आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे म्हटले जात आहे.