Sun, Sep 22, 2019 21:48होमपेज › Nashik › दै.‘पुढारी’तर्फे उद्या दहावी गुणवंतांचा सत्कार

दै.‘पुढारी’तर्फे उद्या दहावी गुणवंतांचा सत्कार

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 11:51PMनाशिक : प्रतिनिधी

दैनिक पुढारी व सायन्स स्टडी सेंटर यांच्या संयुक्‍त विद्यमाने रविवारी (दि.24) दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते सुधीर देशमुख, मुकेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना कार्यक्रमात सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

दहावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या परीक्षेत अथक परिश्रमांच्या जोरावर विद्यार्थी यश संपादित करतात. या यशाबद्दल पाठीवर कौतुकाची थाप पडल्यास त्यांचा आत्मविश्‍वास दुणावतो. हा अवघड टप्पा पार करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या कार्यक्रमात केला जाणार आहे. सोहळ्याला गुणवंत पाल्य व पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.