Wed, Feb 20, 2019 02:53होमपेज › Nashik › अवजड वाहनांना बंदी; शेतमाल न्यायचे वांदे!

अवजड वाहनांना बंदी; शेतमाल न्यायचे वांदे!

Published On: Mar 05 2018 1:44AM | Last Updated: Mar 04 2018 10:56PMकाकासाहेबनगर : वार्ताहर

काकासाहेबनगर ते श्रीरामनगर (कोळवाडी) हा रस्ता पाच वर्षांपूर्वी  पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत तयार झाला. परंतु या रस्त्यावर पालखेड डावा कालवा खेडे शिवारात येतो त्या ठिकाणी पाटबंधारे खात्याने बांधलेला पूल जीर्ण झाल्याने  पाटबंधारे विभागाने या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घातली आहे, असा फलक लावून ठेवला आहे. यामुळे शेतकर्‍यांनी संताप व्यक्‍त करत शेतमालाची वाहतूक कुठून करावी, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

द्राक्षपंढरी असलेल्या उगाव व  परिसरात आता द्राक्ष हंगाम, तर रासाकाचा गळीत हंगाम सुरू असल्याने येथून अवजड वाहनांना वर्दळ वाढली आहे. निफाड, काकासाहेबनगर, उगाव, नांदुर्डी, शिरवाडे वणी, लासलगाव, पिंपळगाव आदी ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना नेण्यासाठी येणार्‍या स्कूलबस  तसेच शेतमाल नेणार्‍या अवजड वाहनांचा राबता या पुलावरून असल्याने पूल दुरुस्ती करण्यापेक्षा वाहतूक बंद केल्याने शेतकर्‍यांनी संताप व्यक्‍त केला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने व लोकप्रतिनिधींनी हा प्रश्‍न सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.