Sat, Mar 23, 2019 18:06होमपेज › Nashik › देशी दारूचा अड्डा उद्ध्वस्त 

देशी दारूचा अड्डा उद्ध्वस्त 

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 11:02PMनाशिक : प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील कॅनॉल रोडलगत देशी दारू बनवण्याचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण विभागीय भरारी पथकाने उद्ध्वस्त केला. याप्रकरणी पंढरीनाथ गोपीनाथ नाईकवाडे यास अटक करण्यात आली. 

भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक व्ही. एम. माळी यांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. विभागाचे उपआयुक्‍त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक सी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शनिवारी कारवाई केली. त्यावेळी एका घराच्या पडवीतून देशी दारू बनवण्यासाठी लागणारे 425 लिटर स्पिरीट व इतर साहित्य असा 2 लाख 25 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. पोलिसांनी नाईकवाडे यास अटक केली, तर रवींद्र राजू भालेराव हा फरार झाला. पथकाने नाईकवाडे यास न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि.20) पोलीस कोठडी दिली आहे.