Tue, Feb 19, 2019 20:35होमपेज › Nashik › नाट्य परंपरेला हातभार लावू

नाट्य परंपरेला हातभार लावू

Published On: Apr 08 2018 2:03AM | Last Updated: Apr 08 2018 12:52AMनाशिक : प्रतिनिधी

मराठी नाटकांची वैभवशाली परंपरा जतन व अधिक समृद्ध करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी व्यक्‍त केला.एका नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने डॉ. ओक हे शनिवारी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आले असता, फ्रेंड्स सर्कलचे संचालक जयप्रकाश जातेगावकर यांच्या पुढाकाराने डॉ. ओक यांच्यासह नाट्य परिषदेचे कार्यकारी मंडळ सदस्य तथा अभिनेते भरत जाधव, सहकार्यवाह सुनील ढगे, परिषद सदस्य सुरेश गायधनी, सचिन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. नाट्यलेखक, दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांच्या हस्ते मान्यवरांचा गौरव करण्यात आला. येथील तरुण नाट्यलेखक व ‘संगीत देवबाभळी’चे दिग्दर्शक प्राजक्‍त देशमुख यांचाही सन्मान करण्यात आला. 

मराठी नाटके अधिक समृद्ध होण्यासाठी, तसेच प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने नाटक बघण्यास येण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. चांगली नाट्यगृहे असणेही गरजेचे आहे. नाट्य परिषदेचे काम केवळ मुंबईतून चालणे उपयोगाचे नाही. त्यासाठी ग्रामीण भागांतही विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय असल्याचे डॉ. ओक हे सत्काराला उत्तर देताना म्हणाले. कार्यक्रमास सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, बालभवन प्रमुख संजय करंजकर, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी कार्यवाह लोकेश शेवडे, भगवान हिरे, सदानंद जोशी, सुभाष पाटील उपस्थित होते. जयप्रकाश जातेगावकर यांनी प्रास्ताविक केले. रजनी जातेगावकर, विशाल जातेगावकर यांनी स्वागत केले.

Tags : Nashik, Contribute, theatrical, tradition