Wed, Apr 24, 2019 20:11होमपेज › Nashik › मराठा क्रांती मोर्चाचा ठिय्या सुरूच

मराठा क्रांती मोर्चाचा ठिय्या सुरूच

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 22 2018 10:25PMधुळे : प्रतिनिधी

धुळ्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरु करण्यात आलेले ठिय्या आंदोलन रविवारी (दि.22) दुसर्‍या दिवशी सुरुच होते. आरक्षणाचा प्रश्‍न सुटल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारपासून हे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. दुसर्‍या दिवशी सकाळपासून शेकडो कार्यकत्यार्ंनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादी युवक आघाडीचे यशवर्धन कदमबांडे यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री आंदोलन स्थळीच खिचडी तयार करून भोजन केले तर सकाळपासून पुन्हा ठिय्या आंदोलन जोमाने सुरू केले.

दरम्यान, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, सचिव निंबा मराठे तसेच रजनीश निंबाळकर, अतुल सोनवणे, रणजीत भोसले, शीतल नवले, प्रशांत नवले, प्रकाश चव्हाण, नीलेश काटे, वैशाली पाटील, हेमाताई हेमाडे, यांच्यासह सर्वच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत सरकारच्या धोरणाचा निषेध केला. दरम्यान आता कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवार आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे सरकार पुढील अडचणी वाढल्या आहेत.

चाळीसगावला आंदोलक आक्रमक

चाळीसगाव  :  आरक्षण मिळेपर्यंत आगामी 72 हजार जागांची मेगा भरती रद्द करावी, आरक्षणाची तारीख जाहीर करावी. यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी चाळीसगावात एकदिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजबांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनास सामाजिक, राजकीय, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील मान्यवर सर्व जातीधर्माच्या हजारो समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला. दरम्यान, मोर्चेकर्‍यांच्या विविध घोषणांनी परिसर दणाणला होता.मराठा समाजाला आरक्षण नसल्याने मुले शिक्षित असतांना देखील नोकर्‍या मिळत नाहीत. शिक्षणात देखील सवलती नसल्याने समाजाचे तरुण शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

यामुळे समाजातील मुले बेरोजगार झाले आहेत. हाताला काम नाही, शेतमालाला भाव नाही. तसेच,  सततच्या  दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे मोर्चेकर्‍यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात मराठा समाजाचे 58 मुक मोर्चे लाखोंच्या संख्येने शांततेच्या मार्गाने निघून देखील शासनाने दखल घेतली नाही. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तुळजापूर येथे गोंधळ जागरण करून मराठा क्रांती ठोक मोर्चाला महाराष्ट्रातील परळी येथून सुरुवात झाली आहे.