Mon, Jan 21, 2019 15:09होमपेज › Nashik › गिरीश महाजन यांच्या मुलाखतीत गोंधळ 

गिरीश महाजन यांच्या मुलाखतीत गोंधळ 

Published On: Feb 25 2018 12:12PM | Last Updated: Feb 25 2018 12:12PMनाशिक : प्रतिनिधी

सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या वतीने दिला जाणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार वितरण समारंभात गोंधळ झाला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांची मुलाखत सुरू असताना आरोग्य विज्ञान विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी आपल्‍या मागण्या मांडल्‍याने महाजन यांनी त्यांना खडसावले. 

‘‘प्रश्न सोडवायचे असल्यास बाहेर भेटा. त्यासाठी ही जागा नाही व प्रश्न मांडण्याची ही पद्धत नाही.’’ अशा शब्‍दात महाजन यांनी खडसावल्‍यामुळे आरोग्‍य विज्ञान विद्यापीठच्या कर्मचाऱ्यांनी वाचनालयाबाहेर निदर्शने केली. पोलिसांकडून निदर्शकांना दमदाटी करण्यात आल्‍याचे काही निदर्शकांनी सांगितले.