Fri, Apr 26, 2019 03:19होमपेज › Nashik › मनपा आयुक्‍त मुंढे जाणार प्रशिक्षणाला?

मनपा आयुक्‍त मुंढे जाणार प्रशिक्षणाला?

Published On: Mar 17 2018 1:14AM | Last Updated: Mar 17 2018 12:26AMनाशिक : प्रतिनिधी

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे हे महिनाभरासाठी प्रशिक्षणाकरता जाणार असल्याची महापालिकेत जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या महिन्यातच दोन दिवसांसाठी मुंढे हे मसुरी येथे प्रशिक्षणासाठी जाऊन आले होते. परंतु, आता पुन्हा महिनाभराकरीता ते प्रशिक्षणाला जाणार असल्याची चर्चा महापालिकेत सुरू झाल्याने अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकदेखील याबाबत एकमेकांना उत्सुकतेपोटी विचारणा करीत आहेत.

आयुक्‍त महापालिकेत रूजू झाल्यापासून त्यांनी आपल्या कडक शिस्तीने भल्याभल्यांना घाम फोडला आहे. यामुळे अनेकांच्या उरात धडकी भरली असून, आयुक्‍त महिनाभराकरता प्रशिक्षणाला जाणार असल्याची नुसती वार्ता ऐकून अनेकांना हायसे वाटले आहे. परंतु, ही अफवा आहे की आयुक्‍त खरोखरच दौर्‍यावर जाणार याबाबत मात्र कोणतीही माहिती नाही. 

Tags : nashik, nashik news, nashik municipal corporation, Commissioner Tukaram Mundhe, training