Thu, Aug 22, 2019 11:06होमपेज › Nashik › शिवडेत ‘समृद्धी’ची संयुक्‍त मोजणी

शिवडेत ‘समृद्धी’ची संयुक्‍त मोजणी

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 11:45PMसिन्‍नर : प्रतिनिधी

मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाची तालुक्यातील तीन गावांत रखडलेली मोजणीला बुधवारी सकाळी 11 ला सुरुवात करण्यात आली. शेतकर्‍यांच्या संमतीने सुरु झालेल्या मोजणीमुळे शिवडेतील संघर्षाची धग काहीशी कमी झाली आहे. तथापी काही शेतकर्‍यांचा अजूनही मोजणीला विरोध आहे. दरम्यान प्रशासनाने दिवसभरात एक किलोमीटची मोजणी पूर्ण केली आहे. काही शेतकर्‍यांनी पालापाचोळा जाळून मोजणीला विरोध दर्शविला.

यावेळी भूसंपादन अधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसीलदार नितीन गवळी, मिनाक्षी राठोड, भूमीअभिलेखचे उपअधीक्षक शशिकांत देशमुख, मंडल अधिकारी गाडे, तलाठी कविता गांगुर्डे, उमा गवळी बांधकाम, महसूल, पाटबंधारे आदी विभागाचे अधिकारी मोजणीत सहभागी झाले होते. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 10 पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते. समृध्दी महामार्ग संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष सोमना वाघ यांच्यासह अनिल शेळके, अंबादास वाघ, बाजीराव हारक, जयराम चव्हाणके, विलास हारक, भास्कर वाघ, बाळासाहेब हारक, राजाराम हारक, मोतीराम हारक, हरीभाऊ शेळके, शिवाजी चव्हाणके आदी शेतकरी उपस्थित होते. वर्षभरापासून शिवडे येथे संयुक्त मोजणीला विरोध होत होता. त्यामुळे राज्याचे लक्ष शिवडे येथील संघर्षाकडे होते. आता मोजणीला सुरुवात झाल्याने विरोधाची धग कमी झाल्याचे बोलले जात आहे.