Thu, Nov 22, 2018 02:02होमपेज › Nashik › शेतकर्‍यांच्या तक्रारींची वाट पाहू नका

शेतकर्‍यांच्या तक्रारींची वाट पाहू नका

Published On: Apr 26 2018 2:02AM | Last Updated: Apr 25 2018 11:16PMनाशिक : प्रतिनिधी

बनावट खते, बी-बियाणे विक्रेत्यांवर कारवाईसाठी शेतकर्‍यांच्या तक्रारीची वाट पाहू नका, स्वत: पुढाकार घेऊन पोलिसांत तक्रारी दाखल करा, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

शासनाच्या कृषी विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक बुधवारी (दि. 24) झाली. या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना काटेकोर सूचना दिल्या. जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम जगताप यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले की, शेततळे, कांदा चाळींसाठी प्राधान्यक्रम ठरवावा व त्यानुसारच कार्यवाही करावी. जिल्ह्यातील बनावट खते, बी-बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिले. शेतकरी पुढे येऊन त्यांनी तक्रार करण्याची वाट पाहू नका. गैरप्रकारांची स्वत:हून दखल घेऊन पोलिसांत तक्रार दाखल करा, असे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी जिल्ह्यातील खरीप पेरणीचे क्षेत्र व उत्पादन उद्दिष्ट, खतांची मागणी व उपलब्धता, शेतकर्‍यांसाठीच्या सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

Tags : Nashik, nashik news, Collector Radhakrishnan B,