Mon, Sep 24, 2018 14:58होमपेज › Nashik › जवान केकाण व पत्नीवर चिंचोली येथे अंत्यसंस्कार

जवान केकाण व पत्नीवर चिंचोली येथे अंत्यसंस्कार

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 02 2017 11:10PM

बुकमार्क करा

सिन्‍नर : प्रतिनिधी

काश्मीरमध्ये पत्नीसह हत्या झालेल्या चिंचोली येथील जवानावर शनिवारी (दि.2) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा आर्यन, मुलगी अनुष्का, वडील आणि लहान भावाचा आक्रोश बघून उपस्थितांचे डोळे पाणावले.

जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील जवान राजेश केकाण व त्यांच्या पत्नी शोभा यांची दोन दिवसांपूर्वी त्यांच्या सहकार्‍याने गोळ्या झाडून हत्या केली होती. राजेश यांचे लहान बंधू गणेश व मुलगा आर्यन यांनी पार्थिवाला मुखाग्‍नी दिला. जम्मू-काश्मीरहून आलेले धर्मपाल सोमकुमार, बिपिनकुमार व सीआयएसएफच्या जवानांनी मानवंदना दिली.