Tue, Jul 16, 2019 12:06होमपेज › Nashik › एलबीटी अ‍ॅसेसमेंटला मुख्यमंत्र्यांची स्थगिती 

एलबीटी अ‍ॅसेसमेंटला मुख्यमंत्र्यांची स्थगिती 

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 25 2018 11:55PMमालेगाव : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या मालेगाव व धुळे व्यापारी आघाडीच्या शिष्टमंडळाची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली. त्यात व्यापार्‍यांची एलबीटीसंदर्भात समस्या मांडल्या. याप्रश्‍नी लवकरच निर्णय घेण्यात येईल, तोपर्यंत एलबीटी अ‍ॅसेसमेंटला स्थगितीचे आदेश देण्यात आले. 

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर 2015 मध्ये आश्‍वासनाप्रमाणे एलबीटी रद्द करण्यात आली. कायद्यानुसार ‘एलबीटी’चे अ‍ॅसेसमेंट करणे बंधनकारक होते. त्यासाठी खासगी कंपनीला ठेका देण्यात आला होता. त्या अनुषंगाने धुळे व मालेगाव महापालिकाने व्यापार्‍यांना नोटीसा दिल्या होत्या. खासगी कंपनीने व्यापार्‍यांना अवाजवी कागदपत्रांसाठी कोंडीत पकडले. मनमानी पद्धतीने कर व दंड भरण्याचे आदेश देण्यात आले. कायद्यातील तरतुदीअंतर्गत दंड भरल्याशिवाय व्यापारी न्याय सुद्धा मागू शकत नसल्याच्या तक्रारी होत्या. भाजप व्यापारी आघाडीने यासंदर्भात केंद्रीयमंत्री डॉ.भामरे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार डॉ. भामरे यांनी मंगळवारी व्यापारी आघाडीची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणली. त्यात आघाडीचे अध्यक्ष सुशील खंडेलवाल, सचिव पंकज अग्रवाल आदी पदाधिकारी यांनी आपली व्यथा मांडली. याप्रश्‍नी लवकरच निर्णय घेण्याचे आदेश देत एलबीटी अ‍ॅसेसमेंटला स्थगितीचे आदेश दिले. त्यामुळे व्यापार्‍यांनी समाधान व्यक्त केले.

बैठकीत व्यापारी आघाडीचे अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, प्रदीप कर्पे, गजेंद्र अंपळकर, भूपेश बडगुजर, सुरेश वाणी, विवेक सूर्यवंशी, प्रवीण भंडारी, नितीन बंग, राजेश गिंदोडीया, दिनेश पटेल, प्रल्हाद मंदन, राजेश रेलन, अनिल किंगर, मनीष वधवा, राजेंद्र पाचपुते, जितुभाई जैन, .बाळकृष्ण खानकरी, मालेगावचे ओमप्रकाश गगराणी, शरद दुसानेे, संतोष देवरे, दीपक अमृतकर, नरेंद्र फुलदेवरे, शब्बीर अहमद अब्दुल सत्तार उपस्थित होते.