Sun, Aug 25, 2019 04:43होमपेज › Nashik › भाजपा सरकार ‘बोलाचाच भात..!’

भाजपा सरकार ‘बोलाचाच भात..!’

Published On: Jul 29 2018 1:24AM | Last Updated: Jul 28 2018 10:29PMपिंपळगाव बसवंत : वार्ताहर

भाजपा सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी असून, विकासाचे  मुद्दे  व सत्य  बोलणे  सरकारला  आवडत  नाही. विधानसभेत राज्याचे प्रश्‍न मांडत असताना सत्ताधारी मंत्री अंगावर धावतात. मात्र, खबरदार आता  अंगावर  आले  तर  शिंगावर घेऊ, असा खणखणीत इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे  नेते छगन भुजबळ यांनी दिला. निफाडचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांनी अशोकराव बनकर पतसंस्थेत भेट दिली. यावेळी भुजबळ यांनी सरकारवर तोंडसुख घेतले.

यावेळी दिलीप बनकर, प्रतापराव मोरे, सरपंच अलका बनकर, उपसरपंच संजय मोरे, विश्‍वासराव मोरे, अ‍ॅड. रवींद्र पगार, सोहनलाल भंडारी, सुरेश खोडे, बाळासाहेब बनकर आदी मान्यवर उपस्थित होते. चोवीस महिन्यांच्या जेलमधील प्रदीर्घ  मुक्‍कामानंतर भुजबळ प्रथमच भुजबळ पिंपळगाव बसवंत येथे आले होते. याप्रसंगी विविध संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

भुजबळ म्हणाले, गत चार वर्षांच्या भाजपा सरकारच्या कार्यकाळात राज्यातील एकही घटक समाधानी नाही. शेतकरी, सामान्य जनता यांना पदोपदी सरकारचा जाच सहन करावा लागत आहे. त्यामुळेच शेतकरी व जनतेच्या मुळावर उठलेले हे सरकार उलथवण्यासाठी दीनदुबळ्यांचे अश्रू पुसून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. निफाड मतदारसंघातून बनकर विधानसभेत पोहचले पाहिजे, अशा निर्धाराने कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन यावेळी भुजबळ यांनी केले. केंद्र सरकारने शेतमालासाठी केलेली  हमीभावाची घोषणा फसवी व दिशाभूल करणारी असून, शब्दांचा व नियमाचा खेळ मांडून पीकविमा भरपाईस शासनाने अनेक शेतकर्‍यांना नकार दिला, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

विलास बोरस्ते यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी गणेश बनकर, रामभाऊ माळोदे, महेंद्र गांगुर्डे, परशराम  आथरे, निवृत्ती धनवटे, नारायण पोटे, सुहास मोरे, रामकृष्ण खोडे, अजय गायकवाड, जयराम मोरे, चंद्रकांत राका, माधवराव ढोमसे, राहुल बनकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.