Mon, Apr 22, 2019 16:06होमपेज › Nashik › गणूर सोसायटीत ३९ लाखांचा अपहार

गणूर सोसायटीत ३९ लाखांचा अपहार

Published On: Dec 12 2017 2:12AM | Last Updated: Dec 12 2017 2:09AM

बुकमार्क करा

चांदवड : वार्ताहर

तालुक्यातील गणूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत तत्कालीन चेअरमन, सचिव व क्लर्क यांनी सोसायटीच्या दैनंदिन व्यवहारात संगनमताने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करून 39 लाख 15 हजार 501 रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांवर चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रात वातावरण दूषित झाले आहे.  तालुक्यातील गणूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन चेअरमन सुधाकर शिंदे, माजी सचिव धोंडीराम साठे, क्लर्क विनायक थेटे हे वित्तीय पतसंस्थेचे

पदाधिकारी म्हणून कार्यरत असताना 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2016 या लेखा परीक्षण कालावधीत सोसायटीच्या दैनंदिन व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.
 या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे, जिल्हा विशेष लेखा परीक्षक डी. एन. काळे यांनी झालेल्या गैरव्यवहाराच्या फेर लेखापरीक्षणासाठी चांदवड तालुका लेखापरीक्षक म्हणून ज्योती घडोजे यांची नेमणूक केली होती. लेखापरीक्षक घडोजे यांनी 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2016 या कालावधीत सोसायटीच्या दैनंदिन व्यवहाराची सखोल चौकशी केली आहे. या चौकशीत सोसायटीचे

तत्कालीन चेअरमन सुधाकर शिंदे, माजी सचिव धोंडीराम साठे व क्लर्क विनायक थेटे यांनी संस्थेत जमा होणार्‍या रक्कमा, बँकेत भरणा न करता रक्कम स्वतःच्या हितासाठी वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोसायटीचे चेअरमन, माजी सचिव, क्लार्क यांनी संगनमताने गैरव्यवहार करीत जवळपास 39 लाख 15 हजार 501 रुपयांचा अपहार केला आहे. यामुळे त्या तिघांविरोधात सोसायटीच्या रकमेचा स्वार्थासाठी गैरव्यवहार केल्याची फिर्याद लेखापरीक्षक ज्योती घडोजे यांनी चांदवड पोलिसांत दिली आहे. या फिर्यादीनुसार चांदवड पोलिसांनी या तिघांविरोधात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास चौधरी तपास करीत आहेत.