Sat, Feb 16, 2019 22:01होमपेज › Nashik › छगन भुजबळ यांच्या स्‍वागताचा कार्यक्रम रद्द

छगन भुजबळ यांच्या स्‍वागताचा कार्यक्रम रद्द

Published On: May 06 2018 2:12AM | Last Updated: May 06 2018 1:41AMनाशिक : प्रतिनिधी

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी सोमवार दि. ७ मे रोजी मुंबई येथे कार्यकर्ते व पदाधिकारी जाणार होते.  परंतु भुजबळ यांच्या प्रकृतीचा विचार करता आयोजित करण्यात आलेला हा स्वागताचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून कार्यकर्त्यांनी तूर्तास मुंबई येथे गर्दी करू नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केले आहे.

आमदार छगन भुजबळ यांना जवळपास २६ महिन्यानंतर जामीन मंजूर झाला ही कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अत्यंत समाधानाची बाब आहे. भुजबळ हे सध्या मुंबई येथे सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आमदार भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या वतीने सोमवार दि. ७ मे रोजी भायखळा मार्केट, राणीच्या बागेसमोर, मुंबई येथे त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जाणार होते. परंतु त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यामुळे कार्यकर्त्यांनी मुंबई येथे गर्दी करू नये व भुजबळ यांना चांगल्या प्रकारचे उपचार घेवून आराम मिळावा यासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी एका पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.