Fri, Nov 16, 2018 19:18होमपेज › Nashik › वाढत्या तापमानामुळे इगतपुरीजवळ व्हॅन जळून खाक

वाढत्या तापमानामुळे इगतपुरीजवळ व्हॅन जळून खाक

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: May 01 2018 12:37AMनाशिक/मुकणे : प्रतिनिधी/वार्ताहर

नाशिक शहर परिसरात तापमानात गेल्या आठवडाभरात कमालीची वाढ झाली असून, त्यामुळे वाहनांना आगी लागण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. पाडळी फाटा-गोंदे दुमाला दरम्यान गॅस पंपानजीक सोमवारी सायंकाळी 7 वाजेदरम्यान मारुती ओम्नी गाडीने अचानक पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाली. प्रसंगावधान राखून गाडीतील चालकाने गाडीतून पळ काढल्याने सुदैवाने मोठी हानी टळली. शनिवारी नाशिक-पुणे मार्गावर तसेच रविवारी द्वारका परिसरात दुचाकीला आग लागण्याच्या घटना ताज्या असतानाच सोमवारी ही घटना घडली. 

पाडळी ते गोंदेदुमाला दरम्यानच्या रोे एर्ड नजीक असणार्‍या कावेरी गॅस पंपावर सायंकाळी घोटीहून नाशिककडे जाणार्‍या मारुती ओम्नी (एम.एच. 04, ए.एक्स. 3653) गाडीचालक देवेंद्र सुराणा व समीर तांबोळी यांनी गॅस भरण्यासाठी पंपावर आणली. यावेळी मारुती ओम्नी गाडीत गॅस भरल्यानंतर सुराणा यांनी गाडी सुरु केल्यानंतर गाडीत स्पार्किंग होऊन गाडीने अचानक पेट घेतला.