अभोणाः वार्ताहर
कठुआ आणि उन्नाव येथील अत्याचाराविरोधात संपूर्ण देशभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. अभोण्यातही ‘जस्टिस फॉर असिफा’चे पोस्टर हाती घेत शेकडो महिलांसह नागरिकांनी सोमवारी रात्री कँडल मार्च काढला. यावेळी चौफुली परिसरात कठुआ येथील अत्याचारात मृत्यू झालेल्या बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मोर्चात सहभागी महिलांनी आरोपीविरोधात मोठा रोष व्यक्त केला. गुन्हेगारांना त्वरित पकडून फाशी द्यावी, अशी मागणी केली. निर्भया प्रकरणानंतर कायदे कठोर करण्यात आले. त्यामुळे देशात अत्याचाराचे प्रमाण कमी होईल, अशी आशा होती. मात्र, त्या कठोर कायद्यांनादेखील आव्हान देत अत्यंत क्रूरपणे अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उन्नाव आणि कठुआ येथे घडला असल्याची प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली. या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी शासनाने तत्काळ पावले उचलावीत, तसेच अत्याचार पीडित मुलीच्या कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी अभोणेकरांनी या कँडल मार्चवेळी केली आहे. यावेळी सुजाता बागूल, प्रिया जाधव, सुनीता येवले, रूपाली गवारे, जयश्री बहिरम, नंदिनी निकम, प्रतीक्षा आहेरराव, मीरा पवार, पूजा आहेरराव, रेणुका कमळास्कर, सुशीला आहेरराव, मेघा जगताप, रूपाली बिरारी, सविता बिरारी, ज्योती आहेर यांच्यासह साहिल शहा, मनोज वेढणे, गोरख सूर्यवंशी, भावडू सोनवणे, जितेंद्र वेढणे, राजू सोनवणे, अशरफ सय्यद, शैलेश वाघ, चेतन दिवाण, अनिकेत सोनवणे, युनूस शेख, समीर शेख, आवेश शेख आदी उपस्थित होते.
Tags : Nashik, Candle, March, Asifa