Tue, Sep 25, 2018 12:32होमपेज › Nashik › शेतकर्‍यांसाठी विशेष अधिवेशन बोलवा ; राजू शेट्टी 

शेतकर्‍यांसाठी विशेष अधिवेशन बोलवा ; राजू शेट्टी 

Published On: Apr 29 2018 2:41PM | Last Updated: Apr 29 2018 2:41PMनाशिक : प्रतिनिधी 

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने शेतकरी कर्जमाफी व मालाला हमीभाव ही दोन विधेयक तयार केली आहेत. ही विधेयके मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. 

रविवारी (दि.29) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. १ मे महाराष्ट्र दिनापासून धुळे ते उस्मानाबाद अशी शेतकरी सन्मान यात्रा काढणार असून, शेतकर्‍यांनी आत्महत्या करु नये, असा संदेश या यात्रेतून दिला जाईल. असे शेट्टी यांनी सांगितले.