Sun, Jul 21, 2019 08:14होमपेज › Nashik › झोक्याचा फास लागल्याने सिडकोत मुलीचा मृत्यू

झोक्याचा फास लागल्याने सिडकोत मुलीचा मृत्यू

Published On: Mar 11 2018 11:58PM | Last Updated: Mar 11 2018 10:56PMनाशिक : प्रतिनिधी

झोका खेळत असताना झोक्याच्या दोरखंडाचा गळफास बसून 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना चुंचाळे शिवारातील जाधव संकुल परिसरात घडली. तितिक्षा किरण राऊळ असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. रविवारी (दि.11) दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात बांधलेला झोका तितिक्षा आणि इतर दोन मुली खेळत होत्या. त्यावेळी पलंगावरून झोका खेळताना झोका तुटल्याने दोरखंडाचा फास तितिक्षाच्या गळ्याभोवती आवळला गेला. फास घट्ट बसल्याने तितिक्षाचा श्‍वास कोंडला गेला.

ही घटना घरच्यांच्या लक्षात येताच तिचे वडील किरण राऊळ यांनी दवाखान्यात नेले. मात्र, उपचारापूर्वीच तितिक्षाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तितिक्षाचे वडील पोलीस आयुक्‍तालयातील प्रशासन विभागात लिपिक म्हणून कार्यरत आहेत.