Fri, Feb 22, 2019 11:36होमपेज › Nashik › नाशिक : मुंबई नाका येथे बसला आग;सर्व प्रवासी सुखरूप (Video)

नाशिक : मुंबई नाका येथे बसला आग;सर्व प्रवासी सुखरूप (Video)

Published On: Dec 10 2017 6:43PM | Last Updated: Dec 10 2017 6:43PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

मुंबई नाका येथे ट्रॅव्हल्स बसला आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही. बसच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मशीन मध्ये बिघाड झाल्याने बसने पेट घेतला.

बसला आग लागल्याचे समजताच बसमधील प्रवाशी खाली उतरल्याने मोठा धोका टळला.  यावेळी तेथे उपस्थित नागरिक व मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बादलीच्या साह्याने पाणी टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर घटनास्थळी आलेल्या अग्निशामक दलानने आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे काही काळ मुबई नाका परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

सदर घटनेची मुबई नाका पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नाही.