Wed, Jul 17, 2019 07:58होमपेज › Nashik › लाचखोर पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात 

लाचखोर पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात 

Published On: Aug 14 2018 1:07AM | Last Updated: Aug 13 2018 11:28PMनाशिक : प्रतिनिधी

तक्रार अर्जानुसार कारवाई करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेणार्‍या अंबड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक महिपाल धनसिंग परदेशी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराने अंबड पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दिला. ज्याच्या विरोधात तक्रार केली आहे त्या संशयितावर कारवाई न झाल्याने तत्काळ कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने उपनिरीक्षक परदेशीकडे केली. मात्र, कारवाई करण्याच्या मोबदल्यात परदेशीने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली.

त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे परदेशीची तक्रार केली. सोमवारी (दि.13) पोलीस ठाण्यातच संशयित परदेशी याने तक्रारदारकडून लाच स्वीकारताच  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास पकडले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. परदेशी यांना नोव्हेंबर 2017 मध्ये हवालदार पदावरून उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. परदेशींकडे अंबडमधील पवननगर चौकीची जबाबदारी सोपवण्यात आली होती.