Fri, Jul 10, 2020 07:36होमपेज › Nashik › नाशिक : दिंडोरीमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्‍महत्‍या

नाशिक : दिंडोरीमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्‍महत्‍या

Last Updated: Nov 15 2019 9:41AM
नाशिक : प्रतिनिधी 

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. दिंडोरी तालुक्यातील या महिन्यातील ही तिसरी तर या वर्षातील 12 वी शेतकरी आत्महत्येची घटना आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अवनखेड येथील शेतकरी शंकर मुरलीधर वसाळ (वय : 55) यांनी गुरुवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास झाडावर दोरीने गळफास घेत आत्‍महत्‍या केली. वसाळ यांच्यावर सोसायटी व एक राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. दिंडोरी पोलिस स्‍टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली आहे.