Wed, Jan 16, 2019 18:14होमपेज › Nashik › बर्थ डे बॉयची वाढदिवसाची रात्र पोलीस कोठडीत!

बर्थ डे बॉयची वाढदिवसाची रात्र पोलीस कोठडीत!

Published On: Jan 04 2018 10:08AM | Last Updated: Jan 04 2018 10:08AM

बुकमार्क करा
पंचवटी : वार्ताहर

भर रस्त्यात धारदार हत्याराने केक कापल्याप्रकरणी पंचवटीतील एका ‘बर्थडे बॉय’ला वाढदिवशी थेट तुरुंगाची हवा खावी लागली. पंचवटी पोलिसांनी या युवकाकडून हत्यार जप्त केले असून, गुन्हा दाखल केला आहे. सुभाष खंडू सांगळे (21) असे या युवकाचे नाव असून, पेठरोडवरील दत्तनगर येथील हा रहिवासी आहे.

सुभाषच्या वाढदिवसासाठी काही उत्साही तरुणांनी केक कापण्याचे नियोजन केले. मात्र, केक कापण्यासाठी धारदार शस्त्र वापरले. याबाबतची माहिती काही जागरूक रहिवाशांनी पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना कळविली. यानंतर काही वेळातच गुन्हे शोध पथकाने घटनास्थळावरून बर्थडे बॉयला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एका लोकप्रतिनिधीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बर्डेकर यांनी केक कापला म्हणून नाही, तर केक हत्याराने कापला म्हणून कारवाई केल्याचे सांगताच या लोकप्रतिनिधीने पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला.

काही युवकांकडून भर रस्त्यात वाढदिवस साजरा केला जातो. दुचाकी-चारचाकीवर ठेवलेला केक कापण्यासाठी चक्क धारदार हत्याराचा वापर केला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.