Wed, Nov 14, 2018 20:53होमपेज › Nashik › भुजबळ लवकरच येवलेकरांच्या भेटीला

भुजबळ लवकरच येवलेकरांच्या भेटीला

Published On: Jun 03 2018 1:17AM | Last Updated: Jun 02 2018 10:51PMयेवला : प्रतिनिधी

येवला तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळासह अध्यक्ष भागुनाथ उशीर यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन प्रकृतीची विचारपूरस केली. संचालक मंडळाने भुजबळांना येवल्यात लवकर या, असा आग्रह करताच काही दिवसांतच येवलेकरांच्या भेटीसाठी आपण येणार असल्याचे भुजबळांनी सांगितले आहे.

येवला तालुक्यात यावर्षी आधारभूत किंमत योजनेअंतर्गत 10 कोटी रुपयांचा शेतमाल खरेदी झाला असून, तालुक्यातील शेतकर्‍यांना व खरेदी-विक्री संघाला यामुळे लाभ झाला आहे. गेल्या 17 वर्षांपासून संघ आर्थिकद‍ृष्टया अडचणीत असताना यावर्षी आधारभूत किंमत योजना प्रभावीपणे राबवल्याने व रासायनिक खत विक्री व्यवसायात आमूलाग्र बदल केल्याने संघ सक्षमपणे उभा राहिला असल्याची माहिती उशीर यांनी भुजबळांना दिली. 

यावेळी असता खरेदी-विक्री संघाच्या कामकाजावर भुजबळांनी समाधान व्यक्‍त केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्रात सहकार क्षेत्र जिवंत असून, त्यांचा आदर्श घेऊनच कामकाज करण्याचा सल्ला दिला यावेळी भुजबळांनी दिला आहे. यावेळी ज्येष्ठ संचालक दामू पा. पवार, दत्ता आहेर, जगन्‍नाथ बोराडे, राजेंद्र गायकवाड, भागुजी महाले, दत्ता आहेर, जगन्‍नाथ बोराडे, मॅनेजर बाबा जाधव उपस्थित होते.