Wed, Nov 21, 2018 11:13होमपेज › Nashik › भुजबळ समर्थक म्हणाले, ‘आर्मस्ट्राँग इज बॅक’

भुजबळ समर्थक म्हणाले, ‘आर्मस्ट्राँग इज बॅक’

Published On: May 05 2018 10:55AM | Last Updated: May 05 2018 10:52AMसिन्‍नर : प्रतिनिधी

आमदार छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्याची वार्ता कळाल्यानंतर शहर व परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महापुरुषांना अभिवादन व अकरा किलो लाडू वाटप करून आनंद साजरा केला. सोशल मीडियावर समर्थकांनी, तर ‘आर्मस्ट्राँग इज बॅक’ म्हणत न्यायालयाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.

आ. भुजबळ यांच्या जामिनाबाबत फैसला होणार असल्याने  कार्यकर्त्यांचे सकाळपासून या बातमीकडे डोळे लागून होते. दुपारी जामीन मंजूर झाल्याची वार्ता कार्यकर्त्यांसाठी आनंददायी ठरली.