Tue, Jul 16, 2019 02:07होमपेज › Nashik › पदाधिकार्‍यांनी घेतली भुजबळांची भेट

पदाधिकार्‍यांनी घेतली भुजबळांची भेट

Published On: May 12 2018 1:32AM | Last Updated: May 12 2018 12:25AMउपनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यामुळे नाशिकमधील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि.10) मुंबई येथील निवासस्थानी जाऊन भुजबळ यांची भेट घेतली. एकीकडे ही भेट भुजबळ यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी असल्याचे पदाधिकार्‍यांकडून सांगितले जात असलेे तरी दुसरीकडे मात्र विधान परिषदेच्या मोर्चेबांधणीसाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे. सांताक्रूझ येथील निवासस्थानी नाशिक शहर महिला कार्याध्यक्षा तथा नगरसेविका सुषमा पगारे, समिना मेमन, पूर्व विधानसभा अध्यक्षा सुरेखा निमसे, वंदना चाळीसगावकर आदींनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी भुजबळ यांच्या तब्येतीची चौकशी केली. नाशिकला कधी येणार या प्रश्‍नावर भुजबळ यांनी एक-दीड महिन्यात येऊ असे उत्तर दिले आहे. या भेटीनंतर  विष्णुपंत म्हैसधूणे, अंबादास खैरे, माजी आ. दिलीप बनकर यांनीही त्यांची भेट घेतली.