Fri, Apr 26, 2019 09:19होमपेज › Nashik › दिग्गज नेत्यांची भुजबळ भेट

दिग्गज नेत्यांची भुजबळ भेट

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 11:24PMनाशिक : भ्रष्टाचार व मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या भुजबळ यांना उच्च न्यायालयाकडून दोन वर्षांनंतर जामीन मिळाला असला तरी सध्या त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, विविध पक्षांचे नेते त्यांची भेट घेत आहेत. बुधवारी (दि.9) दिवसभर दिग्गज नेत्यांनी भुजबळांची भेट घेतली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळांची रुग्णालयात भेट घेत त्यांची विचारपूस केली. तसेच, राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे बंधू व नवी मुंबईचे माजी खासदार संजीव नाईक यांनी भुजबळांची भेट घेतली. नाशिक विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनीदेखील भुजबळांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यापूर्वी समता परिषदेचे पदाधिकारी व भुजबळांचे निकटवर्तीय दिलीप खैरे यांनीदेखील त्यांची भेट घेत त्यांना नाशिकचा पेढा भरवला होता. तसेच, राष्ट्रवादीचे नेते व माजी आदिवासीमंत्री मधुकर पिचड यांनीही भुजबळांची भेट घेतली आहे.