होमपेज › Nashik › अमेरिकन शिष्टमंडळाला भावली आरोग्य सेवा 

अमेरिकन शिष्टमंडळाला भावली आरोग्य सेवा 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

अमेरिकन आंतराष्ट्रीय शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.30) जिल्हा रुग्णालय व सदंर्भ रुग्णालयाला भेट देऊन कर्करोगाच्या निदानासाठी केल्या जाणार्‍या उपचाराची माहिती घेतली. गोरगरिबांना रुग्णालयात चांगल्या दर्चाची सेवा उपलब्ध करुन दिली जात असल्याचे समाधान यावेळी शिष्टमंडळाने व्यक्त केले.

शिष्टमंडळामध्ये रेड एड प्रकल्प समन्वयक ऑलिव्ह पीअर्स, ब्रेस्ट रेडिओलॉजिस्ट लिना ग्रोवर, रेडिओलॉजिस्ट डॉ.इमली अ‍ॅमिंडर, मेमोग्राफि टेक्निशिअन गार्सल सिस यांचा समावेश होता. जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आदिवासी, गोरगरिब यांना दिल्या जाणार्‍या वैद्यकिय सुविधांची शिष्टमंडळाला माहिती देण्यात आली. कर्करोग रुग्णांना आधुनिक पध्दतीने उपचार मिळावे यासाठी रेड एड या संस्थेने पुढाकार घेण्यास तयारी दर्शवली. तसेच, गावोगावी जाऊन कर्करोग तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक मोबाइल व्हॅन उपलब्ध करुन देण्याचा मानस शिष्टमंडळाने यावेळी व्यक्‍त केला. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशिल वाकचौरे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.गजानन होले, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.अनंत पवार, संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ.प्रल्हाद गुठे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Tags : Nashik, Nashik News, Health Service, American Delegation


  •