Mon, May 27, 2019 00:39होमपेज › Nashik › भीमा-कोरेगाव प्रकरण : लासलगावात विद्यार्थी बस फोडली 

भीमा-कोरेगाव प्रकरण : लासलगावात विद्यार्थी बस फोडली 

Published On: Jan 03 2018 9:20AM | Last Updated: Jan 03 2018 9:20AM

बुकमार्क करा
नाशिकः प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव प्रकरणी लासलगामध्ये पाळण्यात आलेल्‍या  बंदला हिंसक वळण लागले आहे.  आंदोलकांनी  मनमाड-लासलगाव बस फोडली आहे. ही जाळण्याचाही आंदोलकांकडून प्रयत्न झाला. मात्र, चालक आणि वाहकाच्या  सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. 

या बसमध्ये सकाळी शाळेत जाणरे विद्यार्थी आणि इतर प्रवाशी होते. चालकाने बस न थांबवता पुढे नेहल्‍यामुळे बसमधील कोणाला काही इजा झाली नाही. 

लासलगाव येथे बस जाळली, बस, रिक्षा बंद
लासलगाव : वार्ताहर 

भीमा कोरेगावामधील घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. अदन्यात लासलगाव आगाराची मनमाड-लासलगाव एमएच 40- एन 8616 ही बस सकाळी लासलगावकडे येत असताना जाळण्‍याचा प्रयत्‍न केला. लासलगाव रेल्वे गेटवर काही संतप्त नागरिकांनी बसच्‍या काचा फोडून व पेट्रोल टाकून बस जाळण्यासाठी प्रयत्न केला. चालक, वाहकांनी विद्यार्थी व प्रवाशांना गाडीच्याखाली उतरवत प्रवाशांचे प्राण वाचविले.

या घटनेची माहिती लासलगाव पोलिस स्टेशन मिळताच त्यांनी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. बस पेटवत असल्‍याचे समजताच लासलगावचे सहाय्‍यक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोलिस हवालदार डी. के. ठोंबरे,  प्रदीप आजगे , मधुकर उंबरे हे तातडीने घटनास्‍थळी पोहोचले.