Sat, Aug 24, 2019 21:11होमपेज › Nashik › भीमा-कोरेगाव दंगल; अकरा जणांना अटक

भीमा-कोरेगाव दंगल; अकरा जणांना अटक

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 09 2018 11:47PM

बुकमार्क करा
शिक्रापूर : वार्ताहर

भीमा-कोरेगाव येथे दि. 1 जानेवारी रोजी उसळलेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी धरपकड सत्र सुरू केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींसह 11 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

अटक केलेले आरोपी दोन्ही गटाचे असून, त्यांना भीमा-कोरेगाव, सणसवाडी व कोंढापुरी येथून अटक करण्यात आली आहे. या आरोपींमध्ये तीन अल्पवयीन आरोपींचा समावेश असून, त्यांना पुणे येथे बाल न्यायालयात सोमवारी (दि. 8) हजर करण्यात आले. न्यायालयाने 1 जानेवारीतील दंगली प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांसह पाच जणांना शुक्रवारपर्यंत (दि. 12), तर 29 डिसेंबर 2017 च्या घटनेतील 6 आरोपींना बुधवारपर्यंत (दि. 10) पोलिस कोठडी सुनावली आहे.

दंगल माजवणे, जाळपोळ, दगडफेक करणे, सार्वजनिक व शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे आदी कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपींची पडताळणी व खात्री करण्याचे काम सुरु केले आहे.सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.