Fri, Jul 19, 2019 13:26होमपेज › Nashik › आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीचे गूढ वाढले

आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीचे गूढ वाढले

Published On: Dec 20 2017 1:42AM | Last Updated: Dec 20 2017 1:41AM

बुकमार्क करा

भगूर : वार्ताहर

भगूर येथील जगदीश बहिरू शिरसाट (37) यांनी सोमवारी (दि.18) रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. मात्र, जिल्हा बँकेने केलेल्या दाव्यानुसार शिरसाट यांच्या नावे कोणतेही कर्ज नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शिरसाट यांच्या चिठ्ठीचे गूढ वाढले आहे. 

जगदीश शिरसाट यांच्या नावे कोणत्याही प्रकारचे कर्ज नसून त्यांचे बंधू संदीप आणि वडील बहिरू हेे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सभासद असून ते कर्जदार असल्याचा दावा जिल्हा बँकेने केला आहे. दरम्यान, संदीप आणि बहिरू शिरसाट यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत प्रोत्साहन रक्कम मिळाली असून, ती त्यांच्या बचत खात्यावर वर्ग केल्याची माहिती जिल्हा बँकेने दिली. त्यामुळे जगदीश यांच्यावर कोणते कर्ज होते, असा प्रश्‍न उपस्थित होत असून, त्यांच्या चिठ्ठीचे गूढ वाढले आहे तर रेल्वे पोलिसांनी ही चिठ्ठी जगदीशच्या खिशातून जप्त केली आहे.