Mon, Apr 22, 2019 21:37होमपेज › Nashik › ‘बेटी बचाव’साठी  नाशिक तेे शिर्डी धाव!

‘बेटी बचाव’साठी  नाशिक तेे शिर्डी धाव!

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 02 2017 10:41PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा संदेश देण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सचिव सुभाष जांगडा यांनी शनिवारी (दि.2) नाशिक ते शिर्डी हे 90 किमीचे अंतर 11 तास 30 मिनिटे सलग धावत पूर्ण केले. 

शनिवारी सकाळी पहाटे 4 च्या सुमारास दत्त मंदिर सातपूर (नाशिक) येथून त्यांनी धावायला सुरुवात केली. दुपारी 3.30 च्या सुमारास ते एकूण 11 तास 30 मिनिटे सलग धावत शिर्डी येथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी श्री साईबाबांचे दर्शन घेऊन समाजात मुलींना मानाचे स्थान मिळावे तसेच स्त्रीभ्रूणहत्या थांबावी, यासाठी साईचरणी साकडे घातले. त्यांच्या या उपक्रमासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा व उपाध्यक्ष राजेंद्र फड यांचे सहकार्य लाभले. समाजातील काही विघातक प्रथांमुळे आज मुलींची संख्या कमी होत असून, ही बाब चिंताजनक आहे. मुलींना जगण्याचा अधिकार मिळावा तसेच त्यांना चांगले शिक्षण देऊन अधिक सक्षम बनविण्यासाठी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा संदेश देण्यासाठी नाशिक ते शिर्डी धावण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला.

या उपक्रमाप्रसंगी त्यांचे शिर्डी येथे शिर्डी संस्थानचे विश्‍वस्त सचिन तांबे यांनी स्वागत केले. तर सिन्नर व पांगरी येथे मुकेश चव्हाणके, राजेंद्र रायजादे, डॉ. संदीप मोरे, राजाभाऊ लोणारी, महेंद्र कानडी आदींनी त्यांचे शहरात स्वागत केले. यावेळी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड, राजेश चौधरी, प्रदीप गुप्ता, सुनील हिरे, भरतभाई पटेल, राहुल जांगडा, संजू राठी, नरेश चौधरी, गणेश चौधरी आदी उपस्थित होते.