Sun, Sep 23, 2018 09:55होमपेज › Nashik › मंत्री महाजन पिस्तुल घेऊन धावले बिबट्याच्या मागे

मंत्री महाजन पिस्तुल घेऊन धावले बिबट्याच्या मागे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जळगाव : चाळीसगाव

तालुक्यात पाच जणांचे बळी घेणार्‍या नरभक्षक बिबट्याच्या शोधासाठी खुद्द जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनीच पुढाकार घेतला.तेही जीवाची पर्वा न करता हातात पिस्तुल घेऊन! बिबट्या सापडला नसला तरी चर्चा रंगली ती महाजन यांच्या पुढाकाराची अन् त्यांच्या हातात असलेल्या पिस्तुलाची! महाजन यांच्या कमरेला लावलेल्या पिस्तुलाचे यापूर्वी अनेकदा दर्शन झाले आहे. यावेळी मात्र  कमरेचे पिस्तुल हातात दिसले. चाळीसगाव तालुक्यात  दोन महिन्यांपासून बिबट्याने पशू, पक्षी यांच्यासह महिला, मुलांचे बळी घेतले आहेत. आतापर्यंत जवळपास पाच जणांचा बळी घेणार्‍या बिबट्याने दहा ते बारा जणांना जखमीही केले आहे. या नरभक्षक  बिबट्याच्या वावरामुळे देशमुखवाडी, वरखेड, उंबरखेड, पिंप्राळा, पिलखोड, नांद्रे, काकडणे, सायगाव, आमोदे, तामसवाडी, पिंपळवाड, म्हाळसा परिसरातील ग्रामसंमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भयभीत ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.सोमवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर,  आमदार उमेश पाटील पोपट भोळे, संतोष भोळे यांच्यासह ग्रामस्थ वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीसांनी शोध मोहीम राबविली. या मोहिमेत महाजन हे अग्रभागी होते. हातात पिस्तुल घेऊन ते बिबट्याच्या शोधासाठी पुढे पुढे धावत होते. एवढेच नाही तर चक्क झाडाझुडपातही शिरले. पण, बिबट्या काही हाती लागला नाही. या सार्‍यांनीच बिबट्याचा वावर असलेले क्षेत्र पिंजून काढले. विशेष म्हणजे, ड्रोनचा वापरही करण्यात आला. पण, बिबट्या मात्र हुलकावणी देण्यात यशस्वी झाला.