Mon, Jan 21, 2019 12:59होमपेज › Nashik › निर्णयापर्यंत वादग्रस्त जागा टास्कफोर्सच्या ताब्यात द्या

निर्णयापर्यंत वादग्रस्त जागा टास्कफोर्सच्या ताब्यात द्या

Published On: Dec 07 2017 1:32AM | Last Updated: Dec 06 2017 11:15PM

बुकमार्क करा

मालेगाव : प्रतिनिधी

अयोद्धेतील वादग्रस्त वास्तू पाडल्याच्या घटनेला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ बाबरी मशीद बचाव समितीच्या 25 कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करत बुधवारी सुलेमानी चौकातून डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोर्चा काढला होता. वादग्रस्त जागेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत न्यायालयाने टास्क फोर्स स्थापन करून त्या जागेवर लक्ष ठेवावे, अशी मागणी करणारे निवेदन उपविभागीय महसूल अधिकारी अजय मोरे यांना सादर करण्यात आले.

अयोद्धेतील वादग्रस्त वास्तू उद्ध्वस्त (6 डिसेंबर 1992) करण्यापूर्वीच ज्येष्ठ समाजवादी नेते निहाल अहमद यांनी 1991 मध्ये बाबरी मशीद बचाव समिती स्थापन केली होती. भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रथयात्रेचा संदर्भ देत त्यांनी कारसेवकांना रोखण्याची मागणी केली होती. व्ही. पी. सिंह सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर अहमद यांची भिती खरी ठरून वास्तू पाडली गेली. तेव्हापासून त्यांनी न्यायासाठी शर्टला काळीपट्टी बांधली. ती त्यांच्याबरोबरच कबरीमध्ये दफन झाली. मात्र अद्यापही वादग्रस्त जागेचा निकाल लागलेला नाही. फेब्रुवारी 2018मध्ये सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणावर सुनावणी होणार असून, त्यासाठी पाठपुरावा करणार्‍या सुन्नी वक्फबोर्ड, ऑल इंडिया मुस्लिम पसर्नल लॉ बोर्डला समितीने पाठिंबा दिला. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले जाईल. तरी प्रस्तुत पुराव्यांनुसार वादग्रस्त जागेवर मशीद पुन्हा उभारली जावी. कोर्टाचा निकाल लागेपर्यंत त्या जागेच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्स स्थापन करावी, आदी मागण्यांचे निवेदन प्रांत मोरे, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांना सादर करण्यात आले.