Thu, Jul 18, 2019 14:56होमपेज › Nashik › भाजपा आमदारांतील धुसफुस मराठा आरक्षणावरून उघड

भाजपा आमदारांतील धुसफुस मराठा आरक्षणावरून उघड

Published On: Jul 29 2018 1:24AM | Last Updated: Jul 28 2018 10:58PMनाशिक : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शहरातील भाजपा आमदारांमधील विसंवाद आणि धुसफुस समोर आली आहे. चांदवड-देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर व नाशिक पश्‍चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी मराठा आंदोलकांकडे आमदारकीचा राजीनामा दिला असताना, आता नाशिक पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप यांनी मात्र आपण थेट विधानसभा अध्यक्षांकडेच राजीनामा देऊ, असे विधान केले आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास पाठिंबा देण्याचे, तसेच राजीनामे देण्याचे आवाहन मराठा समाजाच्या आंदोलकांकडून करण्यात आले होते. त्यानुसार तीन दिवसांपासून लोकप्रतिनिधी आंदोलकांची भेट देऊन पाठिंबा जाहीर करीत आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता पाठिंबा देण्यासाठीही लोकप्रतिनिधींमध्ये चढाओढ लागली असून, भाजपा आमदार  परंतु, नियमानुसार हे राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे न सोपविता आंदोलकांकडे दिल्याने या राजीनाम्यांकडे ‘स्टंट’ म्हणूनच पाहिले गेले. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (दि.28) आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सानप यांनी आंदोलकांना आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यपालांकडे राजीनामा सादर करणार असल्याचे आश्‍वासन दिले. आमदार सानप यांच्या या आश्‍वासनामुळे भाजपा आमदार राजीनामे  नेमके कुणाकडे देणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यानिमित्ताने आपापसातील धुसफुस आणि विसंवादही समोर आला आहे. डॉ. आहेर आणि हिरे यांनी राजीनामे दिल्यानंतर त्यांच्या निर्णयाचे स्वागत कमी आणि टीकाच अधिक झाली. हा प्रसंग आपल्यावर येऊ नये, यासाठी सानप यांनी कार्यकर्त्यांकडे राजीनामा देण्याऐवजी राज्यपालांकडेच राजीनामा सादर करणार असल्याचे सांगून प्रसंग टाळून नेला.