Sun, Jul 21, 2019 06:14होमपेज › Nashik › 1000 फूट मराठी पत्रलेखनामुळे नोंद

कादवा कारखाना येथील कावळे विद्यालयाचा विश्‍वविक्रम

Published On: May 17 2018 1:26AM | Last Updated: May 16 2018 11:37PMदिंडोरी  : वार्ताहर

तालुक्यातील राजारामनगर येथील कादवा कारखाना येथील  बी. के. कावळे विद्यालयाच्या विद्याार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना राजभाषा मराठी गौरव दिनाच्या 1000 फूट लांबीच्या पाठविलेल्या शुभेच्छा पत्र पाठविले होते. या पत्राची दाखल केवळ ना. तावडे यांनीच घेतली नव्हे तर लंडन येथील वंडर बुक ऑफ रेकॉर्ड या संस्ेथने घेतली अहे.लवकरच शाळेला विश्‍वविक्रमची नोंद झाल्याचा बहुमान सन्मानपूर्वक देण्यात येणार असल्याची माहिती पत्र लेखन उपक्रमाचे आयोजक सुरेश सलादे यांनी दिली.

कादवा  कारखाना चेअरमन श्रीराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शैक्षणिक संकुल विविध उपक्रम राबवत असते. सध्या सोशल मीडिया व इतर कारणांनी विद्यार्थ्यांचे  लेखन व वाचन हे कौशल्य हळूहळू कमीकमी होत चालेले आहे. आता इंग्रजीच्या जीवघेण्या स्पर्धेत मराठीकडे विद्यार्थी लक्षच देत नाही. याचा परिणाम इंग्रजीत  पोपटासारखा बोलणारा विद्यार्थी मराठीत कमालीचा गोंधळात आहे. मात्र, मातृभाषेत लेखन, वाचन व उच्चार यात सुधारणा व्हावी म्हणून  कावळे विद्यालयात आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते कवी लक्ष्मण महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली  विविध उपक्रम राबविले जातात. त्या अंतर्गत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवसाच्या औचित्याने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठी भाषा गौरव दिनी विद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

या दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे यांना इयत्ता 5 वी ते 8 वीच्या 1000 विद्यार्थ्यांनी स्वहस्ते मराठीतून पत्र लेखन करीत 1000 फुट लांबीचे शुभेच्छा पत्र लिहिले. ते पत्र ना. तावडे यांना मंत्रालयात पाठविण्यात आले. ना. तावडे यांनी या दीर्घपत्राची दखल घेत अभिनव उपक्रमाबाबत आभारचे व अभिनंदनाचे पत्र पाठविले होते. या उपक्रमाची दखल लंडन येथील वंडर बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेनेही  घेतली असून, आपल्या भारतातील प्रतिनिधीमार्फत दखल घेत नामांकन दाखल केले होते.  या संस्थेचे प्रमुख डॉ. बी. बी. आर यांनी  पत्र पाठवून हा विश्‍वविक्रम होत असल्याचे मान्यता पत्र पाठविले आहे. 

1000 फुट लांबीचे, 1000 विद्यार्थ्यांनी स्वहस्ते लिहिलेले पत्र हे प्रथमच एकाच भारतीय प्रादेशिक भाषेत म्हणजेच मराठीत, एकाचवेळी, एकाच ठिकाणी केवळ अर्ध्या तासात पूर्ण झाले आहे. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक लक्ष्मण महाडिक, पर्यवेक्षक देविदास देसले,  ही.आर जाधव, बी. आर. साळुंके, पी. एस. पाटील, व्ही. के. शिंदे, जे. एन. उफाडे, एस. एस. जाधव, राजू झिरवाळ, सुदाम वाघ, के. बी. बेंडके, पी. एन. पाटील, एस. एस. घोलप, पी. डी. जमधडे, एस. एन. कराटे,  के. जे. अहिरे, व्ही. जे. दिघे यांचे सहकार्य लाभले.