Sat, Nov 17, 2018 03:46होमपेज › Nashik › जिल्हा हागणदारीमुक्‍त

जिल्हा हागणदारीमुक्‍त

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 09 2018 11:23PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाकडे सद्यस्थितीत वैयक्‍तिक शौचालय असून, संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्‍त झाला असून, मंगळवारी (दि.10) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

जिल्ह्यातील एकूण पाच लाख 27 हजार 875 कुटुंबाकडे वैयक्‍तिक शौचालय नव्हते. या सर्व कुटुंबांना शौचालय बांधून त्याचा वापर करण्यास भाग पाडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने विविध प्रकारचे प्रयत्न केले. जनजागृती करताना प्रसंगी कारवाईचाही बडगा उगारण्यात आला. टप्प्याटप्प्याने गेल्या वर्षापर्यंत तीन लाख 79 हजार 029 कुटुंबांनी शौचालय बांधले. 2017-18 मध्ये उर्वरित एक लाख 48 हजार 486 शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट होते. मार्चअखेरपर्यंत हे उद्दिष्ट गाठण्यात यश आले असून, आता संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच कुटुंबांकडे वैयक्‍तिक शौचालय असल्याचा दावा स्वच्छता विभागाने केला आहे. वैयक्‍तिक शौचालय सर्वच कुटुंबांकडे असून, त्याचा वापरही नियमितपणे होत आहे.

Tags : Chief Minister Devendra Fadnavis, At the hands , distribution, Today,