Sat, Jun 06, 2020 06:44होमपेज › Nashik › वर्‍हाडाचा टेम्पो उलटून वाडीवर्‍हेत दोन ठार

वर्‍हाडाचा टेम्पो उलटून वाडीवर्‍हेत दोन ठार

Published On: Dec 20 2017 1:42AM | Last Updated: Dec 20 2017 1:15AM

बुकमार्क करा

अस्वली स्टेशन : वार्ताहर

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील रायगडनगर शिवारात वालदेवी पुलाजवळ मंगळवारी (दि.19) सकाळी दहा वाजेच्या सुमारास वर्‍हाडाचा टेम्पो उलटला. या अपघातात पाच वर्षाचा बालक व अन्य एक जण (नाव समजू शकले नाही) ठार झाले, तर जवळपास पस्तीस वर्‍हाडी गंभीर जखमी झाले आहेत.

पाथर्डी (नाशिक) येथील वर्‍हाड मंगळवारी अस्वली स्टेशन (ता. इगतपुरी) येथे दुपारच्या लग्नविधी सोहळ्यासाठी जात होते. या अपघातात नवरदेव किरण माळीही जखमी झाला आहे. अस्वली स्टेशन येथे आदिवासी भिल्ल समाजाच्या वस्तीवर बाळू बर्डे (रा. नानेगाव) यांच्या मुलीचा विवाह पाथर्डी येथील बाळू माळी यांचा मुलगा किरणशी होणार होता. त्यानुसार ठरल्याप्रमाणे नवरदेव आणि जवळपास पन्नास ते साठ इतर वर्‍हाडी टेम्पोने (एमएच-15, डीके 2090) अस्वली स्टेशनकडे येण्यास सकाळी 9 वाजता निघाले. दहाच्या सुमारास टेम्पो रायगडनगर शिवारात वालदेवी नदीच्या पुलावरून पुढे येताच टेम्पो दुभाजकावर धडकला.

पाथर्डी (नाशिक) येथील वर्‍हाड मंगळवारी अस्वली स्टेशन (ता. इगतपुरी) येथे दुपारच्या लग्नविधी सोहळ्यासाठी जात होते. या अपघातात नवरदेव किरण माळीही जखमी झाला आहे. अस्वली स्टेशन येथे आदिवासी भिल्ल समाजाच्या वस्तीवर बाळू बर्डे (रा. नानेगाव) यांच्या मुलीचा विवाह पाथर्डी येथील बाळू माळी यांचा मुलगा किरणशी होणार होता. त्यानुसार ठरल्याप्रमाणे नवरदेव आणि जवळपास पन्नास ते साठ इतर वर्‍हाडी टेम्पोने (एमएच-15, डीके 2090) अस्वली स्टेशनकडे येण्यास सकाळी 9 वाजता निघाले.

दहाच्या सुमारास टेम्पो रायगडनगर शिवारात वालदेवी नदीच्या पुलावरून पुढे येताच वर्‍हाड जास्त असल्याने टेम्पो हेलकावे घेऊन महामार्गाच्या डिव्हायडरवर जाऊन धडकला आणि डाव्या बाजूला उलटून खोल चारीत अडकला. या अपघातात कार्तिक दीपक माळी (5) आणि अन्य असे दोघे जण जागीच ठार झाले. तर नवरदेव किरण माळी (23), विमल गायकवाड (55), समीर गवळी (10), सुमन गायकवाड (35), द्रौपदा पिंपळे (50), नंदू पिंपळे (40), सोहम पवार (29), रोहिनी पवार (28), यमुना घाडगे (45), राधुबाई जाधव (35), सागर पवार (18), कृष्णा जाधव (40), पुंजा गुंजाळ (15), दीपाली माळी (28), गोपाळ पवार (23) आणि ड्रायव्हर आबा देवराम शेलार (50) गंभीर जखमी झाले असून, इतर वीस ते पंचवीस लोक किरकोळ जखमी झाले आहेत.

या अपघाताची खबर वाडीवर्‍हे पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सुहास देशमुख व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले. नानिज संस्थानच्या रुग्णवाहिकेने तत्काळ जखमी नाशिकला पोहचविले. अस्वली स्टेशन येथे या अपघाताची माहिती मिळताच विवाहाची धामधूम थंडावली. जो तो अपघाताबाबत विचारपूस करत एकमेकांशी करत होते. या विवाह सोहळ्यासाठी वधू पक्षांकडील सर्व वर्‍हाडी वरपक्षांच्या वर्‍हाडी मंडळींची वाट बघत होते.