Mon, Jan 21, 2019 03:46



होमपेज › Nashik › बॅनर लावण्याच्या कारणावरून धुळ्यात जाळपोळ

बॅनर लावण्याच्या कारणावरून धुळ्यात जाळपोळ

Published On: Dec 21 2017 1:04AM | Last Updated: Dec 21 2017 1:04AM

बुकमार्क करा





धुळे : प्रतिनिधी

धुळे शहरात बॅनर लावण्यावरून दोन गटात झालेल्‍या वादातून परिसरात जाळपोळ करण्यात आली आहे. शहरातील पाच कंदिल भागातील गजानन कॉलनी परिसरात ही घटना घड़ली. 

२५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री धुळ्यात एका कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्याच दिवशी हैदराबाद येथील हिंदू जनजागृतीचे भैया राजाही एका कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्‍यांच्या कार्यक्रमाचे बॅनर आयोजकांनी लावले होते. त्यावरून झालेल्‍या वादातून जाळपोळ करण्यात आली. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच घटनास्‍थळी पोलिस दाखल झाले आहेत.