होमपेज › Nashik › एप्रिल फूल करण्याऐवजी एप्रिल ‘कूल’ करा

एप्रिल फूल करण्याऐवजी एप्रिल ‘कूल’ करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

सोशल मीडियावर रविवारी (दि. 1) ‘एप्रिल फुल’चे अनेक मॅसेज व्हायरल झाले, मात्र सर्वांत जास्त फॉरवर्ड झाला तो मॅसेज म्हणजे एप्रिल कुलचा...‘सर्वांना नम्र विनंती...‘एप्रिल फूल करण्यापेक्षा एक वृक्ष लागवड करून एप्रिल कुल करा’, नेटीझन्सनी रविवारी  ‘एप्रिल फूल’च्या विनोदी आणि फसव्या मॅसेजेसबरोबरच ‘एप्रिल कुल’चा हा मॅसेज पाठवून खराखरच पर्यावरण रक्षणाचा जागर केला.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून नाशिककरांनी रविवारी मित्रमंडळींसोबतच आप्तस्वकीयांना एप्रिल फुलचे अनेक मॅसेज फॉरवर्ड केले. हाती गुलाबाचे फुल आणि जोडीला सगळ्यात आधी माझ्याकडून एप्रिल फुलचा मॅसेज, असा संदेश असलेले छायाचित्र एकमेकांना पाठविण्यात येत होते. याशिवाय व्हॉटस्अ‍ॅपवर माय न्यू नंबरचा मॅसेजही सर्वत्र व्हायरल होत होता. हा मॅसेज ओपन केल्यानंतर ‘एक नंबर आहे ना, मग कशाला दुसरा पाहिजे? एप्रिल फुलच्या शुभेच्छा’ असा संदेश पहायला मिळत होता.

मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारमधील 70 हजार पदे भरण्याची घोषणा केल्यानंतर तत्काळ एमपीएससीने जाहिरात काढली आहे, अशा संदेशासोबत पीडीएफ फाईल व्हायरल केली जात होती. ही फाईल ओपन केल्यानंतर त्यात एप्रिल फुलचा संदेश झळकत होता. याचप्रमाणे राज्य कर्मचार्‍यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याच्या मॅसेजलाही भन्नाट पसंती मिळाली. अनेकांनी मोठ्या अनेक्षेने हे मॅसेज ओपन केले खरे; मात्र आपले एप्रिल फूल केल्याचे लक्षात आल्यावर अनेकांचा भ्रमनिरास झाला.

व्हॉटस्अ‍ॅपवर एप्रिल फूल बनवायचे पाच प्रकार असल्याचे सांगणारा मॅसेज व्हायरल झाला. या मॅसेजच्या सरतेशेवटी पहिला हाच होता, बाकी चार पुढच्या वर्षी सांगेन, असा संदेश पाठवत नागरिकांनी एकमेकांना एप्रिल फुलच्या शुभेच्छा दिल्या. 

लग्न झालेल्या मंडळींकडून “मेहरबानी कर के शादीशुदा व्यक्ती को अप्रेल फुल ना बनाये! यह काम उसके ससुर ने कर लिया है’ हा मॅसेज शेअर करण्यात येत होता. व्हॉटस्अ‍ॅपबरोबरच फेसबुक, इन्स्टाग्राम व इतर सोशल मिडीयावरून देखील नेटीझन्सनी एकमेकांना एप्रिल फुलच्या शुभेच्छा दिल्या. 

डीपी मस्त आहे...

व्हॉटस्अ‍ॅपवर डीपी मस्त आहेच्या मॅसेजची क्रेझ पहायला मिळाली. हा संपुर्ण मॅसेज बघितल्यानंतर झालानां एप्रिल फुल, आता लगेच दुसर्‍याला पाठवा नवीन आहे, अशा प्रकारचा संदेश वाचायला मिळत होता.

1 एप्रिलचा इतिहास

1 एप्रिल हा दिवस एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो? फूल म्हणजे मुर्ख. यादिवशी लोकं एकमेकांना मुर्ख बनवतात. हा दिवस स्टीव्ह एप्रिल नावाच्या माणसाच्या मृत्यूपश्चात साजरा केला जाऊ लागला.त्याचा जन्म 1 एप्रिल 1579 ला झाला होता. तो अगदी महामुर्ख होता. त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात 120 व्यवसाय केले. पण एकाही व्यवसायात त्याला यश मिळवता आले नाही.  तो 19 वर्षांचा असताना त्याने एका 65 वर्षाच्या म्हातारीशी लग्न केले. पुढे वर्षभरातच त्याच्या मुर्खपणामुळे तिने त्याला घटस्फोट दिला. त्याला नेहमी खोट्या गोष्टी वाचायला खुप आवडायच्या. जशी तुम्ही आता वाचत आहात. एप्रिल फुलच्या शुभेच्छा...!


  •