Wed, Jun 26, 2019 11:59होमपेज › Nashik › याचिका दाखल करण्याचा गुरुवारचाही मुहूर्त हुकला

याचिका दाखल करण्याचा गुरुवारचाही मुहूर्त हुकला

Published On: Jan 19 2018 1:53AM | Last Updated: Jan 19 2018 12:31AMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्याचा गुरुवारचाही मुहूर्त हुकला. अजूनपर्यंत केवळ कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.

गेल्या वर्षाच्या अखेरच्या दोन दिवसात बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय सहकार आयुक्तांनी घेतला. सहकार कलम 110 नुसार रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचे संचालकमंडळ बरखास्त करण्याचे निर्देश दिले होते. अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसून आठवडाही उलटला नसल्याने बरखास्तीचा निर्णय केदा आहेर यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे या निर्णयाला न्यायालयात आव्हान देऊन स्थगिती मिळविण्याचे जोरदार प्रयत्न दोन-चार संचालक करीत आहेत. पण, अद्याप काही याचिका दाखल होऊ  शकली नाही. 

रविवारी संक्रांत झाल्यानंतर सोमवारी करी दिन होता. त्यामुळे याचिका दाखल करण्यासाठी हा दिवस टाळला गेला. मंगळवारी आणि बुधवारी अमावास्या असल्याने हेही अशुभ मानले. गुरुवारचा शुभ दिवस त्यांनी पक्‍का केला होता. पण, हादेखील मुहूर्त हुकला आहे.