Sun, Jul 21, 2019 02:21होमपेज › Nashik › स्वच्छ सर्वेक्षण यादीत मनपाचे अ‍ॅप १९ व्या स्थानी

स्वच्छ सर्वेक्षण यादीत मनपाचे अ‍ॅप १९ व्या स्थानी

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 11:25PMनाशिक : प्रतिनिधी

मनपाच्या स्वच्छ अ‍ॅपने केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या यादीत 19 व्या स्थानी झेप घेतली आहे. मनपाने याआधी तयार केलेल्या स्मार्ट नाशिक अ‍ॅपमध्येच स्वच्छ अ‍ॅपला स्थान दिले असून, या अ‍ॅपचे नाशिकमध्ये 52 हजार इतके यूजर्स आहेत. 

शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत 4 जानेवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत स्वच्छतेशी निगडित विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. स्वच्छ भारत अभियानात सहभागी झालेल्या अमृत सिटीतील 500 शहरे आणि या व्यतिरिक्त सुमारे साडेतीन हजार शहरांची पाहणी केंद्र शासनाच्या पथकाकडून केली जात आहे. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत विविध उपाययोजना व त्याविषयीचे मार्गदर्शक तत्त्वे केंद्राने स्थानिक स्वराज्य संस्थांना सादर केले आहेत.

त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचून त्यांच्यात स्वच्छतेविषयीची जनजागृती व समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे. मनपाने यापूर्वीच स्मार्ट नाशिक हे अ‍ॅप नागरिकांच्या सोयीसाठी निर्माण केले होते. आता याच अ‍ॅपला स्वच्छ अ‍ॅपची जोड देण्यात आली आहे. सध्या या अ‍ॅपच्या यूजर्सची संख्या 52 हजार इतकी झाली आहे. अ‍ॅपचा वापर, समस्यांचे निराकरण आणि तत्सम गोष्टींच्या आधारावर स्वच्छ सर्वेक्षणातील शहरांचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यात याआधी नाशिकच्या अ‍ॅपचा क्रमांक 283 व्या स्थानी होता. आता हाच क्रमांक 19 व्या स्थानी आला आहे. मनपाच्या स्मार्ट सिटी तथा स्वच्छ अ‍ॅप नागरिकांनी डाउनलोड करून त्या माध्यमातून आपल्या तक्रारी व समस्या तसेच सूचना मांडाव्यात, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.