Mon, Aug 19, 2019 09:06होमपेज › Nashik › सेवाज्येष्ठता डावलून पदोन्नती दिल्याचा आरोप

सेवाज्येष्ठता डावलून पदोन्नती दिल्याचा आरोप

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 1:45AMनाशिक : प्रतिनिधी

पोलीस दलात सेवाज्येष्ठता डावलून कनिष्ठ अधिकार्‍यांना पदोन्नती दिल्याचा आरोप काही अधिकारी करीत आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षकपदास पदोन्नती मिळण्यास पात्र असतानाही राज्यभरातील सुमारे 60 ते 70 सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती मिळाली नसल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. 

गृहविभागाने राज्यभरातील सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती दिली आहे. खुल्या प्रवर्गातील कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यास कोणतीही वैधानिक अडचण नसल्याचा अभिप्राय विधी व न्याय विभागाने गृह विभागास दिला होता. त्यानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्‍त पदे तात्पुरत्या स्वरुपात सेवाज्येष्ठतेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून भरण्यात आली.

ज्या मागासवर्गीय अधिकार्‍यांनी 25 मे 2014 च्या शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे आरक्षणाचा लाभ न घेता पदोन्नती घेतली आहे, त्यांनादेखील खात्री केल्यानंतर पदोन्नती देण्याचा अभिप्राय दिला होता. मात्र, प्रशासकीय विभागाने सेवाज्येष्ठता असलेल्या अधिकार्‍यांना डावलून कनिष्ठ अधिकार्‍यांनाही पदोन्नती दिल्याचा आरोप पोलीस वर्तुळातून होत आहे. 

 

Tags : nashik, nashik news, police, service seniority, promotion,